कायद्याचे ज्ञानाने महिला सक्षमीकरण होईल. :- ॲड. सुचिता इवरे-वनकळसे.


मोहोळ : - "स्त्रियांनी केवळ लिहणे व वाचण्यासाठी साक्षर न राहता.  कायद्याचे ज्ञान आत्मसात करून स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल" असे प्रतिपादन अँड सुचिता इवरे वनकळसे यांनी केले. 
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वडवळ (ता. मोहोळ) केंद्रातर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडे वस्ती (ढोक
बाभूळगाव) येथे महिला सक्षमीकरण सप्ताह अंतर्गत विशेष माता पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी साहेबराव काकडे, शिवाजी काकडे,  संभाजी काकडे, राजाराम  पांढरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल काकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत भोसले, माजी अध्यक्ष कालिदास लोमटे, माजी मुख्याध्यापिका जयश्री धावणे,  मुख्याध्यापक महेश कोटीवाले, महेश टोणपे  उपस्थित होते. 
द्वितीय सत्रात मोहोळ पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल मालती देशमुख यांनी मार्गदर्शन करताना 
"मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी वाचन केले तरच मुलेही वाचन करतील. त्यामुळे मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. याचे योग्य-अयोग्य ज्ञान लहान वयातच पालकांनी मुलांना द्यावे "असे सांगितले .
 या माता पालक मेळाव्यात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेचे बक्षीस वितरण ॲड .सुचिता इवरे, ॲड. श्रीदेवी  काटे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक महेश कोटीवाले यांनी केले आभार महेश टोणपे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post