ज्वारी गहू कांदा हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात करा.
मोहोळ :- सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. यातच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वादळी वारा व अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ज्वारी, गह, हरभरा, कांदा पिकांच्या काढणीला सुरुवात करावी व काढलेले पिके झाकून सूरक्षित ढिकाणी ठेवावेत. असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या सर्व पिकांच्या काढणीला ताबडतोब सुरुवात करावी 17 मार्च ते 21 मार्च च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणे काढलेल्या शेती पिकांचे नुकसान होणार नाही.