मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 55 कोटी रुपयांची तरतूद :- आमदार राजू खरे


दळणवळण व सिंचन गतिमान होणार...

 मोहोळ :- मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाच रस्ते व दोन उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 55 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे आणि पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 80 कोटी रुपये निधीची मागणी केली होती याच मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांच्या कामासाठी 20 कोटी रुपये व उपसा सिंचन योजनांसाठी 35 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून विविध गावे एकमेकाला जोडली जाणार आहेत त्यामुळे दळणवळणही सुकर होणार आहे. परिणामी या गावांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कृती टाकळी सिकंदर या रस्त्याला दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तीर्थक्षेत्र मोहोळ ते तीर्थक्षेत्र वडवळ, गोटेवाडी, कातेवाडी, कुरुल व सोहळे येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खंडाळी पापरी पेनुर ते राज्य मार्ग 65 खंडाळी पापरी पेनुर टाकळी सिकंदर या रस्ता सुधारण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नजीक पिंपरी, अंकोली, कोथळे, येणकी, जामगाव, कोरवली,  हराळवाडी, कामती खुर्द या रस्त्यांच्या विकास कामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत असे एकूण पाच रस्त्यांसाठी  20 कोटी रुपयांचा निधी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे.

उपसा सिंचन योजनेसाठी 35 कोटी..


मोहोळ तालुक्याच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 24 कोटी रुपये  व शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी 11 कोटी रुपयांचा निधी असे एकूण उपसा सिंचन योजनेसाठी 35 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला आहे.
  मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 80 कोटी रुपयांच्या निधीची मागणी. आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती यापैकी 55 कोटी रुपयांचे निधीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मंजुरी मिळाली आहे.


आमदार राजू खरे यांनी मानले सर्वांचे आभार .

मोहोळ विधानसभा मतदारसंघाला निधी मंजुरीसाठी   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पाटबंधारे मध्ये राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी मोलाचे सहकारी व मार्गदर्शन करून निधी मंजुरीसाठी सहकार्य केल्याने. आमदार राजू खरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post