अपघातग्रस्त रायगड जिल्हा पनवेल येथील.
हॅलो पत्रकार न्यूज, मोहोळ.
पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी जवळ शनिवारी मध्यरात्री कारचा भीषण अपघात होऊन पाच जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाले आहे अशी माहिती मोहोळ पोलिसांनी हॅलो पत्रकारशी बोलताना दिली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देवडी पाटील जवळ ईरटीका कार क्रमांक MH46Z - 4536 हि कार पनवेलहून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी चालली होती.
दरम्यान देवडी पाटी जवळ आले असता. चालकाचा कार वरील ताबा सुटून का रस्त्याच्या कडेच्या झाडावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मोहोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली असता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ज्योती जयदास टाकले ही महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेस मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी :- ज्योती जयदास टकले वय 37 वर्षे रा. सेक्टर न 13 पनवेल
मृतांमधे :-
1) माला रवी साळवे (वय 40 वर्षे) राहणार, 2) पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्षे सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट,
3) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे राहणार आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल,
4) अमर पाटील ,खारघर,
5) आनंद माळी.
यांचा मृतांमध्ये समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर झुडपामध्ये मध्ये कार अडकून पडली होती. या वरूनच अपघातग्रस्त कारच्या वेगचा अंदाज येतो. त्यामुळे छीन्न-विचिन्न झालेल्या कारमध्ये सहाजण गंभीररित्या जखमी अवस्थेत अडकून पडले होते. या वेळी पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्तांना बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. तर जखमी महिलेवर उपचार सुरू केले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे मोहोळ पोलिसांनी सांगितले. घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे करीत आहेत.
अखेर स्वामी दर्शन झालेच नाही..!
शनिवारी कामकाज आटोपून रविवारी सुट्टी असल्याने पनवेल येथील मित्रपरिवार अक्कलकोट येथील स्वामी दर्शनासाठी निघाला होते. परंतु देवडी पाटीजवळ शनिवारी मध्यरात्री साखर झोपेतच काळाने झडप घातल्याने. अखेर स्वामी दर्शन झालेच नाही.