चक्क... पोलीस निरीक्षकच झाले फिर्यादी.
हॅलो पत्रकार न्यूज, मोहोळ.
सोशल मीडियावर ऑडिओ व व्हिडिओ वायरल करून मोहोळ पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी दोघां विरोधात. पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मोहोळ पोलिसांनी दिली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील संग्राम फाटे व हर्षु ठाकूर या दोघांना मिळालेली माहितीची खात्री कोणतीही खातर जमा न करता चुकीची माहिती सांगून समाज माध्यमांवर बनावटीकरण केलेला ऑडिओ व व्हिडिओ व्हायरल करून. मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे व मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्या विरोधात पोलीस दलाच्या नाव लौकिकास बाधा आणून बदनामीकारक व पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने सदर बनावट ऑडिओ व व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
त्यामुळे सागर फाटे व हर्षु ठाकूर यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी स्वतः फिर्याद दाखल करून. दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके या करिता आहेत.
सागर व हर्शुचे पुढे काय होणार..?
सोशल मीडियावर राजकारणी ते सामान्य माणसापर्यंत अनेकांची बदनामी होताना सातत्याने दिसते. परंतु याबाबतीत पोलिसात तक्रारी दुर्मिळ दाखल होतात. तक्रार दाखल झालीच तर संबंधित तक्रारीला बेदखल करून पाहिले जाते. मात्र मोहोळ पोलिसांनी हे प्रकरण चांगलेच मनावर घेतल्यामुळेच सागर फाटे व हर्षू ठाकूर यांच्या विरोधात तत्परतेने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या तपासात काय उघड होणार. सागर फाटे व हर्षु ठाकुर यांचे काय होणार. की राजश्रय मिळणार. याकडेच सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.