143 कोटीचे स्मारक उभरणार.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे रवी स्मारकाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी मोठ्या संख्येने नायगाव येथे माळी समाजासह विविध समाजातील सावित्रीच्या लेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष शंकर वाघमारे यांनी हॅलो पत्रकारशी बोलताना अवाहन केले आहे.
स्त्री शिक्षणाच्या जनक व प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिह्वा खंडाळा तालुक्यात नायगांव या गावी त्याचे भव्य स्मारक व्हावे, तसेच तिथे महिला प्रशिक्षण केंद्र असावे अशी मागणी अनेक वर्ष माळी समाजबांधव करत होते.
या स्मारकासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 143 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री आदिती तटकरे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री शिवेंद्र राजे भोसले , खासदार उदयन राजे भोसले, आमदार मनीषा चौधरी , आमदार योगेश टिळेकर , यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा मधुन सुमारे 100 एसटी बसेस तसेच शेकडो चार चाकी वाहनातून हजारो पुरुष आणि महिला निघणार आहेत . या कार्यक्रमासाठी माळी महासंघ, सावता परिषद , समता परिषद , माळी मिशन, क्रांती ज्योती परिषद , सकल माळी समाज आदी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीच्या लेकी निघाल्या नायगावला..!
या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून सावित्रीच्या लेकी मोठया संख्येने निघत आहेत. विविध बसेस या फक्त महिलांच्या स्पेशल निघत आहेत. मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्हातील सर्व तालुक्यातील अनेक गावातून समाज बांधव मोठ्या संख्येने 3 जानेवारी रोजी नायगांव येथे पोहचत आहे. नायगाव येथील कार्यक्रमास यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेते उपस्थित राहत असल्यामुळे यावेळी होणारा कार्यक्रम भव्य असा होणार आहे. त्यामुळे दोन जानेवारी रोजी रात्रीच वाहने नायगांवकडे रवाना होत आहेत.