कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन.
हॅलो पत्रकार न्युज, सोलापूर.
उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने. “सोलापूर शार्क टँक–सिझन २” या राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा देशभरातील नवोदित उद्योजक, स्टार्टअप्स आणि नवकल्पकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
पोस्टर प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक प्रा. व्ही. बी. पाटील, संचालक डॉ. व्ही. पी. धुळप, तसेच उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सहभाग.
"सोलापूर शार्क टँक – सिझन २” या स्पर्धेमध्ये २५ हून अधिक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सहभागी होणार असून, स्टार्टअप्सना थेट गुंतवणूकदारांसमोर आपली संकल्पना सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या माध्यमातून सहभागी स्टार्टअप्सना निधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मौल्यवान अभिप्राय तसेच राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे. विशेषतः देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी ही स्पर्धा अत्यंत लाभदायक ठरणार असून, उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देण्यास मदत होणार आहे. उद्यम फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर आणि परिसरात नवकल्पना व स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, “सोलापूर शार्क टँक” ही स्पर्धा त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले."
या उपक्रमामुळे स्थानिक नवकल्पनांना व्यासपीठ मिळणार असून. रोजगारनिर्मिती व स्टार्टअप संस्कृतीचा विकास तसेच आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. ही स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, इच्छुक स्टार्टअप्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या संकेतस्थळाला भेट द्या.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी स्टार्टअप्सनी http: // incubation.sus.ac.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.