मोहोळकरांच्या स्वप्नातील शहर बनावे....? :-- नंदकुमार फाटे

मोहोळचे माजी सरपंच नंदकुमार फाटे यांची अपेक्षा. 

हॅलो पत्रकार  न्युज.

 मोहोळ :--  मोहोळ शहरातून चार राष्ट्रीय महामार्ग जातात येणाऱ्या काळात शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. मात्र मोहोळ शहर जैसे थेच. मी सरपंच असताना मोहोळ शहराच्या विकासाबाबत अनेक कल्पना डोक्यात होत्या, मात्र त्यावेळीची परिस्थिती व विकास कामांसाठी मिळणारा निधी या बाबी अडचणीच्या ठरल्या मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य विकसित होत आहे.तालुक्याचे नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा च्या उमेदवार शीतल सुशीलकुमार क्षीरसागर यांच्या माध्यमातून आमच्या स्वप्नातील मोहोळ  शहराचा  विकास नक्कीच होईल असा आशावाद मोहोळचे माजी सरपंच नंदकुमार फाटे यांनी व्यक्त केला.

      भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारदरम्यान घर भेटी अंतर्गत माजी सरपंच नंदकुमार फाटे,  भाजपा तालुका अध्यक्ष सतीश काळे, विधिज्ञ हेमंत शिंदे, सुरेश राऊत आदींच्या घरी भेटी दिल्या. त्या प्रसंगी नंदकुमार फाटे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज आपल्या देशाची मान जगभरात उंचविण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे प्रगतशील मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाची व राज्याची प्रगती होत आहे.

    याच धर्तीवर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील भैय्या क्षीरसागर हे उत्तम काम करतील आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधाचा फायदा मोहोळ शहराच्या विकासासाठी होईल.  त्यामुळे मोहोळच्या विकासासाठी आम्ही सर्वजण शीतल क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही यावेळी श्री. फाटे यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी  सुशील भैय्या क्षीरसागर , तालुका अध्यक्ष सतीश काळे, विधिज्ञ  हेमंत शिंदे , सुरेश ( पिंटू) राऊत , प्रभाकर  कुलकर्णी ,  उद्योजक सचिन कवठे, उद्योजक  धनाजी शिंदे ,  व्यापारी धनंजय मैंदरकर माजी सरपंच सारिका संजय क्षीरसागर,  रंजना क्षीरसागर , शुभांगी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post