भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षिरसागर यांचा प्रचारा सुरु.

       
 
                   नेत्यांच्या भेटीने केला श्रीगणेशा. 


हॅलो पत्रकार ✍️ न्युज,

 मोहोळ :- मोहोळ नगरपरिषद निवडणूकीचे विविध राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले. त्याच बरोबर प्रचारालाही सुरूवात झाली असून, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाजपचे जेष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर. यांच्या स्नुषा शीतल सुशीलकुमार क्षीरसागर यांना भारतीय जनता पक्षाने  अधिकृत उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मोहोळ शहरातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या यावेळी सर्वच प्रमुख नेत्यांनी क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला.         


         माझी व तुमची स्पर्धा आता संपली :- सोनवणे

          प्रारंभी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असणारे जेष्ठ नेते नागनाथ सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.व त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यावेळी नागनाथ सोनवणे म्हणाले की, माझी व तुमची स्पर्धा ही उमेदवारी निश्चित होइपर्यंतच होती.आत्ता ती स्पर्धा संपली आहे. आजपासून आम्ही नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या सूनबाई शीतल क्षीरसागर यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करू असे म्हणाले. तदनंतर  चंदूकाका भिवरे,  डॉ.नसीर खान, राम वनकळस, नागेश वनकळस, इमरान शफी शेख,  बिलाल भाई शेख,  अण्णासाहेब देशमुख,  संजय पडवळकर, अपक्ष उमेदवार प्रशांत होनमाने, असलम बागवान, रुपेश धोत्रे दिलीप देशपांडे,  उमर भाई शेख, जुबेर भाई शेख आदींच्या घरी जाऊन भारतीय जनता  पक्षाची भूमिका मांडली. 
      यावेळी मोहोळ नगर परिषद प्रभारी सुशील क्षीरसागर, रुपेश धोत्रे, शहीनाज बेगम  तलफदार, भारत बरे, अझरुद्दीन कुरेशी, प्रशांत गाढवे, तानाजी माने हे उमेदवार तसेच  हेमंत गरड, राजाभाऊ सुतार, ओंकार देशमुख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर, भाजपा शहर उपाध्यक्ष नवनाथ गाढवे, तेजस तलफदार, द्रोणाचार्य लेंगरे ,डॉ.किरण माने, अशोक गायकवाड, रंजना क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर,  सोनिया क्षीरसागर आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र प्रचाराचा नारळ फुटणे बाकी आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post