वडवळ :- निमंत्रित सदस्य दादासाहेब काकडे यांचा सत्कार करताना खर्गे महाराज व मंदिर समितीचे पदाधिकारी.
हॅलो पत्रकार न्युज.
मोहोळ, ता. 2 - मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील श्री नागनाथ मंदिर समितीच्या निमंत्रित सदस्यपदी पोलीस पाटील दादासाहेब काकडे यांची निवड करण्यात आली.
वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व मध्य प्रदेश या पाच राज्यातील लोक दर्शनासाठी येतात त्यामुळे या मंदिर समितीला या पाच राज्यात विशेष महत्त्व आहे
खर्गेमहाराज आकाशबुवा शिवपुजे व पोपटबुवा शिवपुजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे, उपाध्यक्ष शाहीर पवार, विश्वस्त सुभाष शिवपुजे,रघुनाथ मोकाशी, राजाभाऊ शिवपुजे, संतोष शिवपुजे, बाळासाहेब शिवपुजे, महेश कोटीवाले, युवराज शिवपुजे, महादेव ननवरे आदी उपस्थित होते काकडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे पंच क्रोषीतून स्वागत होत आहे.
