महाराष्ट्र शासन व जनता प्रतिष्ठानचा जनकल्याणकारी उपक्रम.
हॅलो पत्रकार न्युज.
मोहोळ, १४ - महाराष्ट्र शासन व जनता प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्तांसाठी शासकीय दाखले व रक्तदान शिबिर मोहोळ येथील ढोक बाबुळगाव रोड सावली बंगला, शासकीय गोदामा समोर जनकल्याण उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मोहोळ तालुक्यात विविध शासकीय दाखले व सेवा नागरिकांना एकाच छताखली उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर बुधवारी (दि. 15)रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडणार असून सावली बंगल्याच्या समोर, शासकीय गोदाम, यशवंत नगर, जुना ढोक बाबुळगाव रोड, मोहोळ येथे हे शिबिर होणार आहे.
हे शिबिर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजनही केले असून. मोहोळ शहर व तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांना तात्काळ विनामूल्य विविध प्रमाणपत्रे व दाखले दिले जातील.
या आहेत शिबिरातील विनामूल्य सेवा.
*आधार कार्ड
*जात प्रमाणपत्र
*उत्पन्न दाखला
*नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
*रेशन कार्ड
*निवृत्तिवेतन योजना
*संजय गांधी निराधार योजना
*रोजगार नोंदणी
*जन्म दाखला
* मृत्यू दाखला
*मतदार ओळखपत्र
*आयुष्मान भारत आरोग्य कार्ड
*अपंगत्व प्रमाणपत्र
*घरपटी प्रमाणपत्र
* वृद्धापकाळ पेन्शन.