अनगर येथील डॉ. गुजरे यांचे ऐकूरके पूरग्रस्तांना गाव जेवण.

 

हॅलो पत्रकार न्युज.

मोहोळ, :-  सीना नदीतला आलेल्या महापुरामुळे  एकुरके (ता. मोहोळ) गावातील घरांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले.  त्यामुळे ग्रामस्थांवर अस्मानी संकट कोसळले आहे. महापुरामुळे झालेले नुकसान कधीही न भरून  येण्यासारखे आहे. अशा अस्मानी संकटात अनगर येथील डॉ. संतोष सुभाष गुजरे यांनी गावाकऱ्यांची एक दिवसाची जेवणाची सोय केली. 

 

संकटाचा सामना धैर्याने करा.

       परंतु महापुरासारखी संकट येते, जाते हाताश  व्हायचं नाही. मोठ्या धैर्याने संकटाचा सामना करायाचा. असे आवाहन डॉ.गुजरे यांनी एकुरकेकरांना केले आहे.

          माणुसकीच्या नात्याने आधार देण्यासाठी.   ग्रामस्थांना जेवणासाठी येणाऱ्या सर्व साहित्याचा व खर्च त्यांनी स्वयं स्फूर्तीने उचलला. स्वयंपाक करण्यासाठी आचारी न लावता ग्रामस्थांनी स्वतः स्वयंपाक बनवून सुमारे सहाशेहुन अधिक पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केली. डॉ. गुजरे यांनी पूरग्रस्तांसाठी संकट वेळी केलेली मदत खूप मोलाची ठरली. आम्ही त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. असे ग्रामस्थांनी सांगितले. डॉ. गुजरे व त्यांचे वडील डॉ. सुभाष गुजरे यांच्याकडे उपचारासाठी एकुरके गावातील लोक नेहमीच जातात. त्यामुळे गुजरे परिवाराशी कौटंबीक ऋणानुबंध झाले आहेत. डॉ. गुजरे नेहमी प्रत्येक रुग्णाशी आपले पणाने सर्व प्रकारची काळजी घेतात. त्यांनी कुटुंबा प्रमाणे दिलेला मदतीचा हात खूप मोलाचा आहे. या स्वयंपाकाचे व्यवस्थापन एकुरकेचे सरपंच शशिकांत कोल्हाळ, भीमराव मोटे , शिवाजी शेटे, मारुती ढवण, अनिल ढवण, औदुंबर ढवण, तानाजी पाटोळे, सचिन साठे, अच्युत ढवण व गावातील युवक व महिलांनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेतले.


   सार्वजनिक स्वयंपाकाची चवच न्यारी...!

एकुरके पूरग्रस्तांना दिलेल्या गाव जेवणातील सर्व पदार्थ गावातील महिलांनी व पुरुषांनी बनवले.  महिलांनी चपात्या व भाजी बनवली तर पुरुषांनी मसाले भात व नवरात्र उपवासाची  शाबू खिचडी बनवली.  हा स्वयंपाकाची चवच न्यारी झाल्याचे एकुरके ग्रामस्थ सांगतात. या वेळी  सर्वांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post