लांबोटी येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक किट वाटप.

आधार पूरग्रस्तांना.....

मोहोळ, ता. 29 :- अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला आणि नदी कडेच्या गावाला त्याचा तडका बसला. आशा बाधित पूरग्रस्तांना छोटीशी मदत म्हणून दादा फाउंडेशन, गुजराती मित्र मंडळ व सचिन सेल्स यांच्या वतीने किराणा मालाचे किट प्रत्येक कुटुंबास वाटप करण्यात आले.
          या किटमध्ये तेल डाळ साबण चादर गव्हाचे पीठ बिस्कीट मसाल्याचे पदार्थ असे जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. जेणेकरून बाधित कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल असा प्रयत्न त्यांनी केला आहे.यावेळी दादा फाउंडेशन(लांबोटी)चे अध्यक्ष विकास जाधव, ग्रामपंचायत सदस्य मोहन खताळ सामाजिक कार्यकर्ते समाधान व्यवहारे, कुमार चट्टे, समाधान संतोष खांडेकर  सोलापूरचे शहा परिवार यावेळेस उपस्थित होते.
आज लांबोटी गावांमधील पूरग्रस्तांना दादा फाउंडेशन व रोटरी क्लब सोलापूर यांच्यावतीने जनावरांसाठी चारा व घरगुती किट वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी रोटरी क्लब ची टीम दादा फाउंडेशन ची टीम विकास जाधव मोहन खताळ विलास शिंदे अरुण गायकवाड कुमार चट्टे समाधान व्यवहारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post