महापूरग्रस्तांसाठी वडवळ श्री नागनाथ देवस्थानने दिली एक लाख रुपयेची मदत.

तहसीलदार सचिन मुळीक यांचेकडे धनादेश सुपूर्द.

मोहोळ, ता. 29 - अस्मानी संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा असतो. तरच संकटग्रस्तांत आधारातून धिर मिळतो. हिच मोठी ताकद आहे. त्यामुळे नागनाथ देवस्थानच्यावतीने मदत करीत आहोत. अशी भावना. वडवळ येथील नागनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे यांनी व्यक्त केली. 
मोहोळ तालुक्यात सीना-भोगावती नदीला आलेल्या महापूरामुळे उध्वस्त झालेल्या नदी काठच्या शेतकरी बांधवाना मदतीचा हात म्हणून  तालुक्यातील वडवळ (ता. मोहोळ) येथील श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटीच्या वतीने एक लाख रुपये मदत निधीचा धनादेश. मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
  यावेळी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे यांच्या हस्ते व  प्रांतधिकारी सचिन इथापे यांचे प्रमुख उपस्थित तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे देण्यात आला. 

     यावेळी गट विकासाधिकारी विवेक जमदाडे, नायब तहसीलदार सुधाकर धाइंजे, नागनाथ देवस्थान पंच कमिटी वडवळचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे, उपाध्यक्ष शाहीर पवार,माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, विश्वस्त महेश कोटीवाले, निमंत्रित सदस्य पोलीस पाटील दादासाहेब काकडे, युवराज शिवपुजे, दयानंद शिवपुजे, महादेव ननवरे
उपस्थित होते.  

पूरग्रस्तांना भक्त निवासात मोफत निवारा. :- अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे

       श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी भक्त निवास येथे मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली याचा लाभ घ्यावा असे पूरग्रस्तांना देवस्थान पंच कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आल्याची माहिती.मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे यांनी दिली. 

Post a Comment

Previous Post Next Post