हॅलो पत्रकार न्युज.
मोहोळ, ता. २७ - धाराशिव जिल्हा परांडा तालुक्यातील कोळेगाव येथील धरण परिसरात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी पुढील पाच दिवसांत होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येणार आहे. परिणामी सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुढील पाच दिवस सतर्क राहून. पूरक्षेत्रापासून. दुरवर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहन कोळेगाव धरण कार्यकारी अभियंता क.वि. कालेकर यांनी केले आहे.
कार्यकारी अभियंता कालेकर पुढे म्हणाले. भारतीय हवामान खात्याने सीना कोळे गाव धरणाचा पाणलोट क्षेत्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी व पर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सीना नदी काठच्या सर्व नागरिकांना पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान आपत्तीग्रस्त परिस्थिती आपले पशुधन, कुटुंब, नवजात बालके, लहान मुले व वृद्ध व्यक्ती, नागरी व गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी पूरग्रस्त परिस्थितीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
करमाळा मोहोळ माढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरला आहे. परंतु कोळगाव धरणातील सद्य स्थितीनुसार 35 हजार शंभर क्यूसेक्सचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे सीना नदीस पुन्हा महापूर जन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पूरक्षेत्र परिसरात किंवा घरात नथांबता सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे.
मोहोळ तालुक्यातील भोगावती व नागझरी या नद्यांचा पूर ओसरला असून. नदीपात्र पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. परंतु सीना नदीला महापूर आल्यास. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर येऊन पुन्हा बाबा ची नदी परिसरात महापूर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे भोगावती व नागरी नदी परिसरातील नागरिकांनी नदीचे पूरक क्षेत्रात न जाता सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.
आठ दिवस सतर्क व सुरक्षित रहा...!
सीना कोळेगाव धरण परिक्षेत्रात सलग पाच दिवस अतिवृष्टी झाल्यास हे पाणी सीना नदीतून परांडा, करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीना नदी ते भीमा नदी दरम्यान पूर ओसरण्यास किमान तीन दिवसाचा कालावधी लागणार आहे. परिणामी नागरिकांनी आठ दिवस सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाल्यास कोणतीही जीवितहानी होणार नाही. हे मात्र नक्की.