राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत पर्यावरण पूरक बाप्पाचे उत्साहात विसर्जन.




नो.... डिजे,  नो... डान्स....

हॅलो पत्रकार न्युज.

मोहोळ,  दि. ४ मोहोळ येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपतीचे मोहोळचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांच्या हस्ते उत्साहात विसर्जन करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी प्रशालेने उचललेले पाऊल अतिशय योग्य असून हा आदर्श सर्वांनी घ्यावा. सण साजरा करताना पर्यावरण रक्षणाचे भान सर्वांनी राखणे गरजेचे आहे. प्रशालेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी प्राचार्य सुधीर गायकवाड, पर्यवेक्षक नाना ताकमोगे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

मातीची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा.

            गणेश महोत्सवापूर्वी प्रशालेत माती पासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत माती पासून गाईड विद्यार्थ्यांनींनी गणेश मूर्ती तयार केल्या होत्या. यामध्ये श्रावणी राऊत हिने प्रथम, प्रणाली हांडे समृद्धी कदम द्वितीय आणि सुष्मिता राऊत हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला .अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत विराज स्वामी प्रथम आला.या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
                सालाबादप्रमाणे प्रशालेत कोणतेही रासायनिक रंग न वापरता शुद्ध मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना  करण्यात आली होती. रांगोळी ,प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर न करता पाना -फुलांची सजावट करण्यात आली होती. मूर्तीचे विसर्जन ही सार्वजनिक जलस्त्रोतात न करता पाण्याच्या पिंपामध्ये करण्यात आले. पिंपातील पाणी प्रशालेतील फुल- झाडांना घालण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयश्री गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले.मोहन व्यवहारे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post