चार राज्यातील येतात वडवळ येथे भावीक भक्त.
हॕलो पत्रकार न्युज.
मोहोळ, १४ - श्री नागनाथ महाराज हे सर्वधर्मीयांचे व राष्ट्रीय एकात्मतेचे श्रद्धास्थान असून. वडवळ (ता. मोहोळ) येथे चार राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या नागेश भक्तांची सेवा करण्यात खरी भाग्य लाभले असून. सोलापूर येथील कोठे परिवार सदैव नागेश भक्तांच्या सेवेत असेल. असे प्रतिपादन डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी वडवळ येथे केले.
वडवळ (ता. मोहोळ) येथील श्री नागनाथ मंदिरात स्व. विष्णुपंत कोठे यांच्या 88 व्या जयंती निमित्त. सोलापूर येथील डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एन्डोस्कोपी सेंटरच्या वतीने. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाण्याचा आरओ प्लांट आर्पण प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले अशुध्द पाण्यामुळे अनेक आजार होतात. बाहेर गावी आल्यानंतर शुध्द पाणी मिळेलच असे नाही. परिणामी नागेश भक्तांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये. म्हणून शुध्द पाण्याच्या आरओ प्लँटची संकल्पना सुचली. असे डॉ. कोठे यांनी सांगीतले.
याप्रसंगी खर्गे महाराज आकाशबुवा शिवपुजे, पोपटबुवा शिवपुजे, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे, उपाध्यक्ष शाहीर पवार, सचिव शाहू शिवपूजे, शामप्रसाद गंजी, विश्वस्त रघुनाथ मोकाशी, संतोष शिवपुजे,महेश कोटीवाले, विनायक गरड,विष्णुपंत बाबर,महादेव ननवरे,युवराज शिवपुजे,दयानंद शिवपुजे,प्रदीप शिवपुजे, परमेश्वर स्वामी,नागेश मठपती,महेश शिवपुजे,नागनाथ शिवपुजे, रविकांत शिवपुजे आदी उपस्थित होते.
श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटीच्या वतीने डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा श्रींची प्रतिमा, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विश्वस्त महेश कोटीवाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.