पाप कुणाचे... शाप कुणा..? बापरे...जीवंत अर्भक आढळले.

                         हॕलो पत्रकार न्युज, 

मोहोळ, ता. १३ :-  मोहोळ तालुक्यातील चिखली येथे जन्मताच एका पुरुष जातीच्या अर्भकाला कपड्यात लपेटलेल्या आवस्थेत. कचऱ्यात टाकलेले आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद मोहोळ पोलीसात झाली आहे. सदर घटनेमुळे पाप कुणाचे.., शाप कुणाला. अशीच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 मोहोळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार. अर्भकाच्या अंगाला जखमा असल्यामुळे त्याला मोहोळ येथील खासगी बालरोग तज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले असून सद्यस्थित प्रकृती स्थिर असल्याचे मोहोळ पोलिसांनी सांगीतले. 

 चिखली येथील एका किराणा दुकानाच्या परिसरातील आढगळीच्या गवताळ व कचऱ्यात नुकतेच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भाकाला कपड्यात लपेटून टाकण्यात आले. सदर माहिती चिखली येथील पोलीस पाटील विठ्ठल मते यांनी मोहोळ पोलीसांना दिली असता. पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून. त्वरीत पोलीस यंत्रणा कामाला लावली. त्या अर्भकास उपचार करण्याच्या सुचना दिल्या. अर्भकाला वेळेत उपचार मिळाल्याने.  त्याची प्रकृती सद्यस्थित स्थिरावली आहे. 

    अर्भकास टाकून देणाऱ्या अज्ञाताचा शोध सुरु. :- पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे.

           या संदर्भात संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार तूर्तास अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येत असून. अर्भकास टाकून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन. त्यास अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी हॕलो पत्रकार न्युजला दिली. 
 

Post a Comment

Previous Post Next Post