संतांचे शब्द हे हिरे माणिकांपेक्षाही मौल्यवान असतात :- दिपक खरात.

 

   वयाच्या 93 व्या वर्षी लिहीले दोन ग्रंथ.

नरखेड , ता. 12 - संताच्या शब्दांत संस्कृती व संस्काराची खुप मोठी ताकद आहे. त्यामुळे संतांचे शब्द हे हिरे माणिकांपेक्षाही मौल्यवान आहेत. असे प्रतिपादन तेर (जि. धाराशीव) येथील जेष्ठ निरुपणकार दिपक खरात. यांनी नरखेड (ता. मोहोळ) येथे संत गोरोबाकाका कुंभार व राका कुंभार चरित्र ग्रंथ प्रकाशन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी व ग्रामीण साहित्यकार फुलचंद नागटीळक होते. 

     नरखेड येथील सिद्धेश्वर मंदिरात संत गोरोबा काका कुंभार व राका कुंभार यांचे चरित्र ग्रंथ व  वसंत ज्ञानेश्वर महाराज चरित्रामृत  या दोन व विविध ग्रंथाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या ग्रंथ प्रकाशानाला सोलापूर,  धाराशिव, लातूर  जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

       संत विचारां प्रामाणेच  संत सुध्दा सर्व समावेशकच असतात. त्यांची जाती-पातीमधे वाटणी करु नका. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना कवी फुलचंद नागटिळक यांनी  केले. कार्यक्रमात सरपंच बाळासाहेब मोटे, ब्रम्हानंद कुंभार, नंदकुमार कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

       लेखक आप्पासाहेब कुंभार यांनी 34 वर्ष शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी लिहिलेल्या दोन ओवीबध्द ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पारपडला. नरखेड येथील जेष्ठ साहित्तीक व समीक्षक (कै.) गो. मा. पवार यांच्या नंतर  नरखेड येथील लेखक म्हणून आप्पासाहेब कुंभार (गुरुजी) हे एकमेव आहेत. 

        कार्यक्रमास कवी फुलचंद नागटीळक, दत्तात्रय गायकवाड, सरपंच बाळासाहेब मोटे, ब्रम्हानंद कुंभार, प्रमोद कुलाल, डॉ. वसंत लवंगे, लेखक आप्पासाहेब कुंभार, नंदकुमार कुंभार, आशोक उबाळे, डॉ. महेश भोरे, प्रदिप पाटील, सिध्देश्वर स्वामी, जयवंत पाटील व पंचक्रोषीतील नागरीक बहुसंखेने उपस्थीत होते. सुत्रसंचालन दिनेश नरळे यांनी केले तर अभार अशोक उबाळे यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post