मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रज्ञा बनसोडे यांची निवड.

          हॕलो पत्रकार न्युज.
मोहोळ, ता.१० - राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी ऋतुजा सुर्वे यांची तर  मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रज्ञा बनसोडे यांची निवड.करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्य उमेश पाटील यांनी सकाळला सांगीतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष  खा. सुनीलजी तटकरे साहेब, युवती प्रदेशाध्यक्ष मा. संध्या सोनावणे व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मान्यतेनुसार जिल्हा युवती काँग्रेस अध्यक्षा  ऋतुजा अरूण सुर्वे 
यांचीही निवड जाहीर केली.

मोहोळ तालुक्यात पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी, महिलांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी आणि महिला सबलीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या नियुक्तीचे महत्त्व आहे. नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील युवती काँग्रेस संघटन कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनवाढीसाठी आणि पक्षाची धोरणे गावोगावी पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post