जिल्हा रुग्ण कल्याण समीतीच्या सदस्यपदी सुरज जम्मा यांची निवड.

श्री. जम्मा यांना आहे रुग्ण सेवीची आवड.
    हॕलो पत्रकार न्युज.
मोहोळ, ता. १० :- सोलापूर जिल्हा रुग्णालय  रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाच्या सदस्य पदी सुरज जम्मा यांची निवड करण्यात आली आहे.  सदर नियुक्तीचे पत्र सुरजा जम्मा यांना  जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ. सुहास माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.                
                     सुरज जम्मा हे सोलापूर येथील शाहीर वस्ती येथील रहिवासी आहेत.  त्यांना रुग्णसेवेची  आवड असून.  त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व   मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील गरीब व गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून व शासनाच्या विविध आरोग्य योजनेतील शासकिय निधीतून आर्थिक मदत मिळवून देऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत.  या त्यांच्या निस्वार्थी कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेत. त्यांना सोलापूर जिल्हा  रुग्ण कल्याण समितीच्या  सदस्य पदी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नियुक्ती केली आहे.

    राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांच्या आशीर्वादाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मंगेशजी चिवटे साहेब यांच्यामुळे  जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वांचे सुरज जम्मा यांनी सहहृदय अभार मानले आहेत. या निवडीचे विविध स्तरातुन स्वागत होत आहे.                         

   रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा :- सुरज जम्मा.

  विविध आजाराने ग्रासलेल्या शरीराला शारीरिक मानसिक व आर्थिक वेदना प्रचंड प्रमाणात सहन करायला लागतात. याच वेदनायुक्त  शरीराला वेदना मुक्त करणे म्हणजेच रुग्णसेवा होय. रुग्णू सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून. जिल्ह्यातून. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक पेशंटला अधिकाधिक उपचार कसे मिळवता येतील यासाठी शासन स्तरावर मनोमन प्रयत्न करणार आहे. असे नुतन सदस्य सुरज जम्मा यांनी हॕलो पत्रकार न्युजशी बोलताना सांगीतले. 

Post a Comment

Previous Post Next Post