सोलापूर, पंढरपूर, माढ्यात आयोजन.
हॅलो पत्रकार न्यूज.
मोहोळ, ता. २९ :- सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे आर आर फाउंडेशनच्या ऑनलाईन नोंदणी व इतर विविध विषयांसाठी. एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील भुसे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस तीन ठिकाणी कार्यशाळा होणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
१) सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तलुक्यांसाठी 31 जुलै रोजी सोलापूर हिराचंद नेमचंद वाचनालय येथे वेळ सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत.
२) पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा या तलुक्यांसाठी 31 जुलै रोजी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
३) माढा, करमाळा, बार्शी. या तालुक्यांसाठी १ आॕगस्ट रोजी. रयत शिक्षण संस्था माढा महाविद्यालय येथे. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना आर आर आर एल एफ पोर्टल नोंदणी, ग्रंथ संजीवनी व वृक्षारोपण उपक्रम व एलजी एम एस प्रणाली या विविध विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी नियोजित वेळेपुर्वी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील भुसे यांनी केले आहे.