मोहोळ, ता. 26 - विविध कार्यक्रम व समारंभ म्हटलं की पुढार्यांच्या हस्ते उद्घाटनासाठी ढोल-ताशांचा कडकडाट व फटाक्यांचे आतष बाजीसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्यांची समाजात कमी नाही. परंतु या सर्व अनावश्यक बाबींना फाटा देत. जन्मदात्या आई-वडिलांच्या हस्ते आपल्या दवाखान्याचे उद्घाटन करून. डॉ. शुभम चौधरी यांनी समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. त्यामुळे नरखेड मध्ये आज या आई-बापासाठी सोनेरी दिवस उगवला आहे.
हाता-तोंडाचा ताळमेळ जुळवुन मुलांचे शिक्षण करणारे नरखेड येथील चौधरी कुटुंबातील डॉक्टर शुभम चौधरी यांनी. आधार क्लिनिक या नावाने नरखेड येथे छोटेखानी हॉस्पिटलची सुरुवात केली आहे. आई अनिता व वडील बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते उदघाटन करीत. आई-वडिलांप्रती कृतज्ञता बाळगुन. तसेच ग्रामीण भागाची गरज ओळखुन. विविध शहरां ऐवजी ग्रामीण भागातच वैद्यकीय सेवेला सुरवात केली आहे. वैद्यकिय शिक्षण अहिल्यानगर जिल्हा, संगमनेर तालुक्यातील अश्वीबुद्रुक येथे झाले.
वैद्यकीय सेवा सुरू करणे म्हणजे डॉक्टर बनने नव्हेच. व्यवसायातील अनेक चढ-उतार बाजूला सारुन. निस्वार्थीपणे दिर्घकालीन रुग्ण सेवा करणे म्हणजेच खरी रुग्ण सेवा होय. असे मत मोहोळ येथील बालरोग तज्ञ डाॕ. दिलीप कादे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास. डॉ. सुप्रिया रुपणर (पुणे), डॉ. अंकुश चव्हाण (धुळे), डॉ. आशिष ठाकुर (नंदुरबार), डॉ.गणेश बाजड (वाशी), डॉ. वामन शेषराव (पुणे), सुशिल पवार (अहिल्यानगर). मोहोळ तालुक्यातील डॉ. बबन मोटे, डॉ. सिदार्थ ढवळे, संतोष गुजरे, गणेश ऐतवाडे, डॉ. उमेश मेंडगुळे, डॉ. अमोल पाटील, डॉ. महेश बनसोडे, डॉ. शिवानी भोरे, डॉ. वसंत लवंगे, सरपंच बाळासाहेब मोटे, विनोद पाटील, वैद्यकीय व न्यालयीन क्षेत्रातील विविध मान्यवर, ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थितीत होते. सुत्रसंचालन दिनेश नरळे यांनी केले. अभार अशोक धोत्रे यांनी मानले.
प्रसार माद्यमांनी न्याय दिला अन् शुभम डॉक्टर झाला. :- बाळासाहेब चौधरी.
शुमच्या वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी शासकीय निकष डावलुन. प्रवेश नाकारल्याने त्या वेळी मी आनेकांकडे तक्रार घेवुन गेलो. कोणीही दखल घेतली नाही. परंतु प्रसार माध्यम प्रतिनीधींकडे धाव घेतली. बातमी प्रसिध्द होताच शुभमचा वैद्यकीय प्रवेश झाला. त्यामुळेच शुभम डॉक्टर झाल्याचे वडील बाळासाहेब चौधरी यांनी सकाळला सांगीतले.