सुषमा साठे यांची मोहोळ तालुका राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षपदी निवड.

हॕलो पत्रकार न्युज.

मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील सुषमा मधुकर साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या मोहोळ तालुका महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
             पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या मोहोळ तालुकाध्यक्षा सौ. शुभांगी तुकाराम लंबे यांनी ही घोषणा केली. खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुषमा साठे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

   पक्षाच्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, "पक्ष संघटनेची मजबुती व विस्तार साधण्यासाठी सुषमा साठे यांचा अनुभव व कार्यक्षमतेचा निश्चितच उपयोग होणार आहे," असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
      सुषमा साठे यांच्या निवडी बद्दल लोकनेते साखर कारखाण्याचे माजी चेअरमन हनुमंत पोटरे, सरपंच दिपक चव्हाण व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post