पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या रागातुन, सासऱ्याचा खून, मेव्हणा व सासू गंभीर जखमी.
मोहोळ, ता. 28 - पत्नीला नांदायला न पाठवल्याने व न्यायालयात दावा दाखल केल्रिचा राग मनात धरुन. जावयाने सासऱ्याचा खून केला. तर सासू व मेव्हण्याला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजता घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली. घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादिची बहिण निशा हिला नांदायला पाठवले नाही. व न्यालयात दावा दाखल केल्याचा राग मनात धरुन. वडवळ (ता. मोहोळ) येथील मंगेश देविदास सलगर (वय 35 ) याने रविवारी (ता. 27) रोजी मध्यरात्री बारा वाजता रामहिंगणी (ता. मोहोळ) काळेवस्ती शेतातील घराच्या पोर्च मध्ये. फिर्यादिचे वडील बापूराव मासाळ हे झोपले असता. मंगेश सलगर याने धारदार चाकूने बापूराव मासाळ यांच्या तोंडावर, अंगाव व पायावर भोसकुन खून केला.
या घटने दरम्यान फिर्यादीच्या आई व स्वतः फिर्यादी सोडवण्यासाठी गेले असता. फिर्यादी अभिषेक बापूराव मासाळ याच्या डाव्या बाजूच्या काखेत, डाव्या पायाला, गुडघ्यावर, पायाच्या पोटरीवर, उजव्या मांडीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले आहे. तसेच फिर्यादीच्या आईच्या उजव्या डोळ्याजवळ, छातीवर व उजव्या बरगडीवर तसेच डाव्या हाताच्या पंजावर चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे वडवळ येथील मंगेश देविदास सलगर यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.