मोहोळ :- एकुरके (ता. मोहोळ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण करीत ग्रामदैवत भैरवनाथाच्या जत्रेत विविध कलागुणांचा उधळला बहारदार कार्यक्रमात गुलाल उधळला. त्यामुळे या कार्यक्रमाला पंचक्रोषीतील नागरीकांनी बालकलाकारांच्या कला प्रतिभेला भरभरुन दाद दिली.
वार्षीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जय गणेशा जय गणेशा, इथे गाजले दोनच राजे कोकण जन्म भूमीवर, पिंगा ग पोरी पिंगा , छावा, पुष्पा टू , लावणी, कोळीगीत, शेतकरी गीत, मिलिटरी सॉंग, विनोदी नाटिका, मोबाईल वेड, अंगात आलय देवा, माझी सख्खी बायको गेली, आपलीच हवा, गुलाबी साडी, लिंबूनी चं लिंबू आदी गीतांचे सादरीकरण उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यात आली.
एकुरके येथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रे निमित्त सांस्कृतिक वारसा जपणुकीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरके येथील वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी यात्रे दरम्यान साजरे केले जाते . यावर्षीही थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेमध्ये सतरा वर्ष सेवा करून आदर्श विद्यार्थी घडवणारे शिक्षक बलभीम राऊत यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सरपंच शशिकांत कोल्हाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित ढवण, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन जगन्नाथ कोल्हाळ, हर्षवर्धन ढवण, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मयुरी पाटील, तुकाराम गायकवाड, पोलीस पाटील सुवर्णा ढवण, उपसरपंच पृथ्वीराज ढवण, केंद्रप्रमुख शरद पवार, मुख्याध्यापक सुधाकर काशीद, आप्पासाहेब देशमुख हनुमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी राजेंद्र मोटे , संदिप साळवे दिनकर ढवण , प्रफुल्ल शेटे , सुभाष कल्याणी , भागवत वाघ, रोहित राशनकर यांनी परिश्रम घेतले क्रांती सोनवणे या शिक्षकांचे मार्गदर्शन तर रविकिरण गुंडू यांनी नृत्य दिग्दर्शकानी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शेटे यांनी केले अभार राजेंद्र मोटे यांनी मानले